न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचे सर्वाधिक ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ८ पुरुष आणि ३ महिला रुग्ण आहेत. त्यातील एकही रुग्ण ६० वर्षांवरील नाही, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.
अकरापैकी ७ जणांनी परदेशवारी केली असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ११ पर्यंत पोचली आहे. त्यात पुरुष ८ आणि महिला ३ रुग्ण आहेत. त्यात ६० वर्षांवरील एकही रुग्ण नाही.
यापैकी ३ रुग्ण हे प्रवास के करून आलेले आहेत. तर, त्यांच्यासंपर्कात आलेले ४ जण बाधित झाले आहेत. थायलंड, जपान, अमेरिका आणि फिलिपिन्समधून प्रवास करून आल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत २६२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. बहुतेकांना त्यांच्या घरातच क्वॉरंटाईन केले गेले आहे.













