न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाबाबतची माहिती देण्यासाठी सारथीचा ८८८८००६६६६ हा क्रमांक जाहीर केला असून ‘ कोरोना १९ कोवीड ‘ व जनता कर्फ्यूची माहिती घेण्यासाठी एका दिवसात दोन हजार दोनशे तीस काॅल्स त्यांवर प्राप्त झाले.
सारथी ही प्रणाली १५ ॲागस्ट २०१३ पासून सुरु झाली असून आज प्राप्त झालेले काॅल्स सर्वाधिक असून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत.
सारथी हेल्पलाईन मध्ये एकूण दहा ऑपरेटर काम करतात. वर्षातील सर्व दिवस आणि २४ तास सारथी हेल्पलाईन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. सारथी हेल्पलाईन सुरू झाल्यापासून मागील ७६ महिन्यांमध्ये एकूण १६ लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी सारथी ला ४ लाख १८ हजार कॉल रिसिव्ह झालेले आहेत. सदर कॉल्समध्ये माहिती घेणे व तक्रार नोंदवणे असे दोन प्रकारचे कॉल समाविष्ट आहेत. सारथीवर नोंदवलेल्या तक्रारी या संबंधित विभाग प्रमुखांना सिस्टिमद्वारे पाठवल्या जातात व संबंधित विभाग प्रमुख त्या तक्रारींवर कार्यवाही करून नागरिकांच्या समस्यांचे निराकारण करतात. आजपर्यंत सारथी ला कॉल करून अनेक नागरिकांनी साथीचे आभार व्यक्त केले आहेत.












