न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- राज्यात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आता आणखी एकाचा जीव गेला आहे. मुंबईत कोरोनानं फिलिपिन्सवरून आलेल्या ६८ वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्याचा मृत्यू झाला आहे.
फिलिपिन्समधून आलेल्या प्रवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेला हा आठवा रुग्ण आहे. गेल्या २४ तासांत १५ नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत १४, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे.













