न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या भीतीने त्रस्त आहे. त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आपल्या घरात सुरक्षित आहेत. मात्र, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल व इतर लोकं आपल्या सेवेसाठी चोवीस तासमेहनत घेत आहेत.
तळवडे येथील वाहतूक विभागही डोळ्यात तेल घालुन काम करत आहे. लोकांना जास्त गर्दी करू नका, विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, स्वतः ची काळजी घ्या, असे वारंवार सांगत आहेत.
ते आपली काळजी घेतात. तर, आपण का त्यांची काळजी करू नये? म्हणून आमदार पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फ’ प्रभागाचे स्वी. नगरसदस्य तथा जनसेवक पांडुरंग भालेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तळवडे येथील वाहतूक पोलीस विभागातील अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटाईजरचे वाटप केले. यावेळी पोलीस निरीक्षक भोसले उपस्थित होते.













