न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावत आहे. त्यासाठी कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्या अश्विनीताई तापकीर यांनी जनजागृती करीत पुढाकार घेतला आहे.
त्यांनी शुक्रवार (दि. २० मार्च) रोजी आरोग्य विभागातील कर्मचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना घरोघरी जाऊन तापकीरनगर, काळेवाडी परिसरात मोफत मास्कचे वाटप करण्यात केले. यावेळी व्यंकटेश्वरा मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत तापकीर, मंडळाचे उपाध्यक्ष मनोज शिंदे, बाळू भावसार आदी उपस्थित होते.













