न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शाहूमहाराज (के.एस.बी) चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मीला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्य राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश शर्मा, शिरिष रोच उपस्थित होते.
तसेच भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये प्राणांचे बलिदान देणा-या शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मीला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे उपस्थित होते.













