न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- कोरोना विषाणुंचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कफर्युचे आवाहन नागरीकांना केले होते. या आवाहनाला शहरातील नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन कोरोना संसर्गाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी दाखवलेली एकजुट आणि सहकार्य याचा सार्थ अभिमान आहे, असे महापौर उषा उर्फ ढोरे म्हणाल्या.
जनता कर्फ्यू दरम्यान शहरात एकही अनुचित प्रकार घडला नाही. यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांनी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने कायदा व सुव्यवस्था प्रश्न हाताळला शिवाय महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे देखिल आपत्कालीन व्यवस्था आणि कोरोनाचा प्रदर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा समन्वयाने कार्यन्वित करत आहेत. या सर्व यंत्रणांच्या कामाचे कौतुकही महापौर माई ढोरे यांनी केले.
कोरोना विषाणुंचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकिय, आरोग्य, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल, प्रशासन, अतिक्रमण, भांडार, माहिती व जनसंपर्क आदी विभागांच्या अधिकारी आणि कर्मचा – यांनी समन्वय ठेवून गतीने कामकाज करत आहेत. या सर्व यंत्रणेला सर्व पक्षीय पदाधिकारी आणि नगरसदस्य सर्वोतपरी सहकार्य असणार असल्याची ग्वाही महापौर ढोरे यांनी दिली.
स्थायी समिती सभापती संतोष आण्णा लोंढे यांनी कोरोना विषाणुंचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महापालिका करीत असलेल्या उपाययोजनाबद्दल तसेच शहरातील नागरीकांनी जनता कर्फ्यूला केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. शहराचे आरोग्य संतुलित आणि निरोगी रहावे यासाठी महापालिका प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्न करीत आहे. कोरोना विषाणु संदर्भात जनजागृती करुन नागरीकांनी नेमकी कशी काळजी घ्यावी असे आवाहन विविध माध्यमातून करण्यात येत आहे. महापालिकेच्या आवाहनाला नागरीक उत्तम प्रतिसाद देत असून कोरोना विषाणंचा प्रर्भाव रोखण्यासाठीनागरीकांचे सहकार्य महत्वपूर्ण असणार आहे.
नागरीक करीत असलेल्या सहकार्याबद्दल महापौर ढोरे यांनी शहरवासियांचे आभार मानले. यापुढेही नागरीकांनी सहकार्य कायम ठेवून आपले शहर निरोगी राखण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.
पक्षनेते नामदेव ढाके यांनी देखील जनता कर्फ्यूला नागरीकांनी दिलेल्या संपूर्ण प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नागरीकांनी गरजे शिवाय घराबाहेर पडू नये, शासन तसेच महापालिकेने दिलेल्या सुचना तथा आदेशांचे पालन करावे तसेच अत्यावश्यक सेवेतील यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पक्षनेते ढाके यांनी केले.













