न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचा-यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत.
आज अखेर शहरातील ३ लाख ३७ हजार २७२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले ९१० जण ‘होम क्वॉरंटाईन’ मध्ये ठेवण्यात आले आहे.
या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या १०० टीम कार्यन्वित आहेत. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांनी आपल्या शरीराच्या तापमानाची तपासणी घरातच करावी. त्याची नोंद ठेवावी. महापालिकेच्या तपासणी पथकाला माहिती देऊन आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.













