- छाया सोळंके-जगदाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- कोरोनाचे पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन करीत संचार बंदी लागू केल्याने नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत असामाजिक तत्वांनी जिवनाश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री आणि काळा बाजार सुरू केला आहे. काळाबाजार करणा-यां विरोधात संघटीत गुन्हेगारी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी, मराठी एकीकरण व विकास आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर अचानक मागणी वाढल्याने मास्क व सॅनिटाइजरचा तुटवडा निर्माण झाला होता. सरकारने लॉकडाऊन करीत संचार बंदी लागू केल्याने नुकताच मुंबईत अनेक ठिकाणी काळा बाजार करणा-यां कोट्यावधी रूपयांचे मास्क पोलीसांनी जप्त केलेत. संचारबंदीमध्ये नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत असामाजिक तत्वांनी जिवनाश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री आणि काळा बाजार सुरू केला आहे.
पिंपरी चिंचवड व पुण्यात देखील भाज्या व फळे यांच्या सोबत किराणा साहीत्य या जिवनाश्यक वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकण्यात येत आहेत. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. कृषी माल तुर्त ऊपलब्ध असला तरी नाकेबंदीमुळे व लोकांमधील भितीचे वातावरण पाहता जिवनाश्यक वस्तूचा पुरवठा व मागणीचे प्रमाण व्यस्त होईल. परिणामी काळाबाजार करणा-यांना अधिक फावणार आहे. गोर गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या शेतकरी, कामगार व मजूरांना ह्याचा फटका बसत आहे. सरकारने यावर उपाय योजना करताना गरीब जनतेला करीता मोफत धान्य, तेल, दाळी, तांदूळ शासकीय यंत्रणा राबवून झोपडपट्टी भागात घरोघरी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभी करावी. तसेच दारिद्र्य रेषेखालील जनतेच्या खात्यात २००० रूपये जमा करावेत. तसेच संचारबंदी मध्ये काळाबाजार करणाऱ्या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायदा अंतर्गत मोक्का कार्यवाही करण्याची मागणी मराठी एकीकरण व विकास आघाडीच्या छाया सोळंके जगदाळे यांनी केली आहे.


















