न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२०) :- परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या १ हजार २१ नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. या नागरिकांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यंत घरातच थांबणे आवश्यक आहे.
मात्र यापैकी दहा नागरिकांनी ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेने नोटीस बजाविली आहे. दरम्यान, आजअखेर शहरातील ३ लाख ७३ हजार ४१४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन न केल्यास होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.
त्यानुसार त्यांना पोलिसांमार्फत ताब्यात घेऊन १४ दिवस क्वारंटाईनची व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.















