- गुगल प्ले द्वारे मोबाईल अँप डाऊनलोड करण्याकरीताची लिंक :-
- https://play.google.com/store/apps/details?id=com.dataapp&hl=en_IN
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध शंकांचे निरसण व्हावे, कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व शासनाचे निर्देश/सुचना इत्यादी बाबतची संपुर्ण माहिती नागरिकांना व्हावी, यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आज मंगळवार, दि. २४.०३.२०२० रोजी “पीसीएमसी स्मार्ट सारथी” मोबाईल अँप नागरिकांच्या सेवेसाठी दाखल केलेला आहे.
हा मोबाईल अँप हा गुगल प्ले स्टोअरवरून एन्ड्राईड मोबाईलधारकांसाठी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे अँपल युजर्सकरीता सदरचा मोबाईल अँप, अँप स्टोअरवर उपलब्ध आहे. सदरचा अँप डाऊनलोड करण्यासाठी PCMC Smart Sarathi यानावाने सर्च करावे. हा मोबाईल अँप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर या अॅपवर ‘रजिस्ट्रेशन’(नोंदणी) करून सदर अॅपचा वापर करता येईल.
सद्यस्थितीत नागरिकांना शहरामध्ये सुरू असलेल्या विविध घडामोडींची माहिती तत्काळ उपलब्ध होईल यादृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सेवा सुविधांचा एक भाग म्हणून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनाशी संबंधीत आरोग्य विषयक सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर अँपद्वारे नागरीकांना कोविड-१९ बाबत चेकलिस्ट उपलब्ध करून देणेत आलेली असून सदर चेकलिस्टद्वारे कोविड-१९ या विषाणूच्या लक्षणाबाबत एकूण १३ प्रश्न विचारणेत आलेले आहेत.
सदर प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर महापालिकेस सदर नागरिकांची आरोग्य विषयक संपुर्ण माहिती उपलब्ध होणार असून मनपाचे वैद्यकीय अधिकारी सदर नागरीकाशी व्यक्तीश:ह संपर्क साधून वैद्यकीय उपचाराबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करतील. सदर अँपचा वापर केल्याने नागरिकांस तत्काळ सेवा/वैद्यकीय मदत उपलब्ध होऊन कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेस मदत होईल. तसेच याव्यतिरिक्त वेळोवेळी मोबाईल अँपद्वारे घरीबसून नागरिकांना जास्तीत जास्त सेवा भविष्यात उपलब्ध करून देणेत येणार आहे. या मोबाईल अँपद्वारे देण्यात येणा-या सुविधेचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग करावा व सदर मोबाईल अँप डाऊनलोड करावे. तसेच कोरोना बाबत सेवेचा लाभ घ्यावा याबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभागृह नेता नामदेव ढाके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आवाहन केले आहे.
गुगल प्ले द्वारे मोबाईल अँप डाऊनलोड करण्याकरीताची लिंक :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.dataapp&hl=en_IN
अँपस्टोअर द्वारे मोबाईल अँप डाऊनलोड करण्याकरीताची लिंक :-
https://apps.apple.com/in/app/pcmc-smart-sarathi/id1495025693













