- दोन दिवसात मिळू शकते गोड बातमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या १० संशयितांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोना बाधित असलेल्या १२ जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील पाच दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नाही.
शहरात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १२ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयाच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. १२ मार्च रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन रुग्णांचे १४ दिवस पुर्ण झाले आहेत. या रुग्णांच्या घश्यातील द्रवाचे नमुने आज पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा रिपोर्ट उद्या येणे अपेक्षित आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले. शहरवासीयांसाठी ही दिलासायदक बाब आहे.













