न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या टप्यातील होम क्वारंटाईन कक्षाची विविध ठिकाणी सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेने १० मुख्य लिपिकांची पयर्वक्षेक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे.
कोरोना विषाणूंचे संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीतील कामकाजासाठी तातडीने खबरदारी म्हणून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पर्यवेक्षक सहायक आयुक्त जोशी यांच्या नियंत्रणाखाली पुर्ण वेळ काम करणार आहेत. सत्येंद्र प्रसाद, संजय घुले, किशोर गावडे, धनसिंग धायगुडे, सुनील, बाळू लोंढे, ज्ञानेश्वर गोरडे, दिलीप वाघमोडे, अजित नखाते, मरळीकर या मुख्य लिपिकाची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कामावर रूजू न होण्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाहे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.













