न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ११६ वरुन १२२ वर पोहचली आहे. आज मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण आढळल्याने ११६ वरुन ही संख्या १२२ वर गेली आहे. त्यांना प्रवासाचा इतिहास किंवा संसर्ग असे कारण आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान १४ सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.













