न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२०) :- सांगलीत १२ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही १४७ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बातमी आहे असंच म्हणता येईल.
सांगलीत १२ जणांची करोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. इतरांच्या संपर्कात आल्याने या १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
याबाबत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. “एकाच कुटुंबातले १२ जण पॉझिटीव्ह आढळल्याने इस्लामपुरात कडक निर्बंध पाळण्यात येणार आहेत. घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. एकच व्यक्ती बाहेर पडणार, त्या व्यक्तीच्या हातावर स्टॅम्प मारण्यात येणार. जे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या घराजवळचे भाग बंद केले जाणार. त्या भागात कोणीही जायचं नाही. तिथे कुणाला खरेदी करायची असेल तरीही एकच व्यक्ती बाहेर जाणार.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.सांगलीतील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातल्या १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. ज्या भागात हे १२ जण राहतात तो भाग बंद करण्यात असल्याचं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच या कुटुंबातील एकाच व्यक्तीला बाहेर पडता येईल. त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.















