न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२०) :- गेल्या काही दिवसांपासून केरळ वेगळ्याच घटनांमुळे चर्चेत आहेत. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद असल्यानं मद्यपींनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात केरळमध्ये घडल्या. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्याकडं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल त्यांना दारू देण्यात यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
राज्यात विविध भागात मद्यपींच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी दारूचं व्यसन जडलेल्यांना दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल अशा मद्यपींना दारू विक्री करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर दारूच्या आहारी गेलेल्यांना मोफत उपचार करण्यात यावे असंही म्हटलं आहे.


















