न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२०) :- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हावी, यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी पुढाकार घेत, शहरातील विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे अत्यावश्यक असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यामार्फत फवारणी सुरु केली आहे.
यावेळी देहूरोड बाजार, एम बी कॅम्प, परशीचाल, इंद्रप्रभा, वृंदावन सोसायटी व वार्ड क्रमांक ४ चा भाग, तसेच देहूरोड भाजीपाला मंडई व संपूर्ण बाजारपेठ या परिसरात मोठ्या टँकरच्या सहाय्याने हायड्रोक्लोराईडयुक्त औषधाची फवारणी करण्यात आली.
तसेच वार्ड क्रमांक एकमध्ये शेलारवाडी, कोटेश्वरवाडी, शेलारमळा, अमरदेवी मंदिर परिसर या भागात पाच पंपाच्या साह्याने सेंटर बोर्डाच्या आरोग्यमित्रांना बरोबर घेऊन फवारणी करण्यात आली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी संपूर्ण देहूरोड परिसरात औषध फवारणी केल्यामुळे परिसर सुरक्षित झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा आसपासच्या परिसरात शिरकाव होणे आता दुरापास्त झाले आहे. -विलास शिंदे (युवा नेते, भाजपा)


















