न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२०) :- पिंपरीतील काळेवाडी पुलाजवळ असलेल्या प्रथमेश हाऊस या इमारतीजवळ आज सायंकाळच्या सुमारास मोर पाहण्यास मिळाला. अरुण वाणी यांनी संबंधित मोर पाहिला. तो घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यांनी त्याला पाणी, ज्वारी आणि खरबूज खाण्यास दिले.
त्यानंतर जुनी सांगवी येथील वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. संबंधित मोर घाबरलेल्या स्थितीत होता. तो अन्नाच्या शोधात बहुदा नागरी वस्तीत आला असावा. चतुश्रृंगीच्या मागील बाजूला वन विभागाचे राखीव पट्टे आहेत. तेथे हा मोर सोडण्यात येईल. त्यासाठी त्याला वन विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे.’












