- खडकीतील रहिवासी असणाऱ्या एकाला कोरोनाची लागण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच अतिक्रमण वाढत आहे. कोरोनाने शहरात चक्क शंभरी पार केली आहे. महापालिकेने सोमवारी १७१ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांचे अहवाला आज मंगळवारी सकाळी प्राप्त झाले आहेत.
या अहवालात शहरातील तब्बल आठ जणांना तसेच खडकीतील एका वायसीएममध्ये दाखल असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या नऊ जणांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरुषांची वये अनुक्रमे १६,१८,२२, २४,२७, ३४, तर महिलांचे वय अनुक्रमे १५, १८, १९ अशी आहेत. हे सर्व रुग्ण निगडी-रुपीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. तर एक खडकीतील महिला आहे.
यामुळे शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १०५ वर गेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ७५ वर गेली आहे. तर, २९ जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.













