न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- सरकारी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. मंगळवारी (दि. २८) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ११७ जणांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
यात भोसरी २, पिंपरी ५, चिंचवड ७, निगडी २, आळंदी ६, चाकण ९, दिघी ६, म्हाळुंगे चौकी २, सांगवी २१, वाकड १९, हिंजवडी १६, देहूरोड ३, तळेगाव दाभाडे ३, चिखली १३, रावेत चौकी १ एकूण ११७ जणांवर कारवाई केली आहे. यांच्यावर संचारबंदी लागू असताना असताना अत्यावश्यक वस्तू आणि सेवा घेण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडणे, तसेच विनाकारण सार्वजनिक ठिकाणी घुटमळणे हा गुन्हा आहे.


















