न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर तक्रारदार व त्यांचे सहकारी अशा २ गाड्या पोलीस अधिकाऱ्याने अडविल्या. गाड्या सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार रुपये असे २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.
चालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार हे बालरोड लाइन्स यांचे हायड्रोलिक/ एक्सएल गाडीवर चालक असून ते गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नईवरुन निघून राजकोटला जात होते.
ती दोन्ही वाहने ३ मे रोजी लॉकडाऊन उठल्यानंतर नंतर सोडली जाईल, असे कंटेनरचालकाला त्याने सांगितले. कंटेनरला पुढे सोडण्यासाठी तडजोड रक्कम १५ हजार रुपयांची लाच ठरली आणि स्वीकारली. दरम्यान आरोपीला संशय आल्याने त्याने ती लाचेची रक्कम टेबलावर फेकून, वाहनाद्वारे पुणे शहराकडे धूम ठोकली. सत्यजित अधटराव असे या पोलिसाचे नाव असून, तो वडगाव महामार्ग केंद्रावर सहायक पोलिस निरीक्षक म्हुणुन नियुक्त आहे. ही घटना बुधवारी नऊ वाजता दरम्यान उर्से टोलनका येथे घडली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.















