न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली.


















