- विविध घटकांतून निरीक्षक आयुक्तालयात..
- गुन्हे शाखेसह तळेगाव एमआयडीसीवर नवी नियुक्ती..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ ऑगस्ट २०२६) :- राज्याच्या पोलिस दलातील १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयावरही झाला आहे. विविध पोलिस घटकांतून १२ पोलिस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयुक्तालयातील दोन निरीक्षकांच्या अन्य घटकांत बदल्या करण्यात आल्या असून, आयुक्तालयांतर्गतही काही निरीक्षकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली झालेल्या निरीक्षकांमध्ये प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमार शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर) आणि अमोल गवळी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) यांचा समावेश आहे.
आयुक्तालयातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, तर विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलिस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे आयुक्तालयातील गुन्हे शाखा आणि महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या कामकाजात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून, आगामी काळात त्याचा पोलिसिंगवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.


















