न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- पिंपळे गुरव येथे दारू पिताना झालेल्या भांडणातून मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला घडली. संतोष कुलकर्णी (वय ४४, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज रविवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मयत संतोष आणि त्याचे मित्र पिंपळे गुरव परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून दारु पिण्यास बसत होते. तसेच त्यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडणही झाले होते. रविवारी दुपारी ते पुन्हा दारु पिण्यासाठी बसले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. या भांडणात संतोष याच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. सांगवी पोलीस घटनास्थळी दाख झाले असून अधिक तपास सुरू आहे.















