न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- दिघीचा स्थानिक नगरसेवक लक्ष्मण उंडे याने “व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी १४ फेब्रुवारी रोजी आपल्या पत्नीला निवडणुकीच्यावेळी राहते घर तुझ्या नावावर केले होते. आता ते माझ्या नावावर करून दे. नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला दिघी गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिली आहे.
या ज्येष्ठ नगरसेवकाने परप्रांतीय तरुणीला घेवून काही दिवसांपूर्वी पलायन करून, पत्नीला नोटीस पाठवून घटस्फ़ोट देण्यास सांगितले होते. त्यामुळे संबंधित नगरसेवकाच्या पत्नीने याबाबत भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती व नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला होता.
यमुना उंडे (वय ४४. रा. साई पार्क, दिघी) यांनी गुरुवारी (दि. २१) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत .