न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- देशात गेल्या २४ तासत ६३८७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून १७० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५१ हजार ७६७ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ४३३७ इतकी झाली आहे.
सध्या देशात करोनाचे ८३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान ६४ हजार ४२५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते मार्चमध्ये ७.१ टक्के होते, तर आता ते ४१.६ टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगभरात सर्वात कमी असून ते ३.३ टक्कय़ांवरून २.८७ टक्कय़ांवर आलेले आहे, तर जगभरात मृत्यूचे सरासरी प्रमाण ६.४ टक्के आहे. रुग्णांचे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे.


















