न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली घरकुल परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाने ५५ वर्षीय पोलीस मित्राला बेदम मारहाण केली आहे.
अरुण गोसावी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून पोलीस उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप गोसावी यांनी केला आहे. दरम्यान, गोसावी हे गेल्या दहा वर्षापासून पोलीस मित्र म्हणून काम करीत आहेत.
विशेष म्हणजे घरकुल परिसरात पोलीस बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांच्या जेवणाची आणि आरामाची व्यवस्था हेच अरुण गोसावी करीत आहेत. त्यामुळे गोसावी यांनी नाराजगी व्यक्त केली असून, संबंधित घटनेची सत्यता पडताळून चौकशी करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले आहे.


















