- ‘मी सुरक्षित तर परिवार सुरक्षित’; आमदार लांडगेंचा कार्यकर्त्यांना मूलमंत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै. २०२०) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आपले राजकीय विरोधक व पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. दत्ता काका साने यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या संदेशात त्यांनी दत्ता काकांच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
तसेच आमदार लांडगे व त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाला असून, ते आता घरीच उपचार घेत आहेत. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना या पोस्टद्वारे केले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘रविवार २८ जून रोजी मला अस्वस्थता वाटल्याकारणाने मी माझी कोरोना चाचणी केली. त्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याकारणाने पहाटेच मी उपचारासाठी बिर्ला हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झालो. सोमवार ते गुरूवार तेथे माझ्यावर उपचार झाले. गुरुवारी माझ्यासह माझ्या सहपरिवार करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पिंपरी-चिंचवड वाय.सी.एम. मधील डॉ. विनायक पाटील यांच्या सल्ल्याने मी व माझ्या कुटुंबाने होम आयसोलेशनचा पर्याय स्विकारत आम्ही घरी उपचार घेत आहोत. त्यामुळे माझ्या हितचिंतकांनी काळजी करू नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व आठवड्यातील २ दिवस (रविवार, गुरुवार) जनता कफ्यूंचे काटेकोरपणे पालन करावे. सोशल डिस्टंनसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. अतिआवश्यक कामासाठीच घराबाहेर पडा. मी सुरक्षित तर परिवार सुरक्षित’, असा संदेश त्यांनी दिला आहे.
नमस्कार,
माझे सहकारी मित्र, दत्तात्रय (काका) साने राजकीय क्षेत्रात ते माझे विरोधक जरी असले तरी ते माझ्या वैयक्तिक जीवनात माझे एक उत्तम मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनवार्ताने पुर्ण शहर सुन्न झाले. एक सामान्य नागरिक ते नगरसेवक तथा विरोधी पक्षनेतेपद भुषविणारे आमचे सहकारी मित्र काकांची राजकीय कारकीर्द कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हा आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो, हिच प्रार्थना करतो व त्यांना अंतकरणातून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करतो….













