न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या रेकॉर्डवरील अट्टल वाहनचोर गोविंदस्वामी चेन्नी, किवळे येथील मुकाई चौकात बीआरटी बस स्टॉपजवळ चोरीचे वाहन घेऊन विकण्याकरिता येणार आहे. पोलिसांनी तात्काळ ऍक्शन टीम तयार केली व आरोपीस ताब्यात घेण्याकरता ते रवाना झाले. आरोपी चेन्नी हा काळया रंगाची दुचाकी घेऊन चौकात आला.
पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीसह पळून जाताना त्याला पकडण्यात आले. आरोपी चेन्नीची विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या वाहनांची कबुली दिली असून त्याच्याकडून तीन दुचाकी व एक ऑटो रिक्षा असा एकूण १,४०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोविंदस्वामी सेल्वराज चेन्नी (वय.36 रा. साबळेबंधू बिल्डिंग, विश्रांतवाडी जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीला पुढील तपासकामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी श्यामसुदंर गुट्टे, फारुक मुल्ला, नितिन बहिरट, राजकुमार इघारे, भरत माने, धनंजय भोसले, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, दयानंद खेडकर, गोपाळ ब्राम्हंदे, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, गणेश मालुसरे यांनी केली आहे.













