- विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर आजपासून कारवाई; आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (दि. ५) जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागात दुकाने बंद होती. तर काही ठिकाणी सुरू होती. दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. शनिवारी (दि. ४) रात्री ऐनवेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घोषणा केलेल्या जनता कर्फ्यूचे नियोजनच नसल्याने फज्जा उडाला.
पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही साखळी तुटावी यासाठी महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आठवड्यातून रविवार व गुरुवार असे दोन दिवस लॉकडाऊनची सूचना केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी रात्री आठ वाजता शहरात रविवार व गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. मात्र, अचानक केलेले हे आवाहन लोकांपर्यंत फारसे पोचले नाही.
त्यामुळे अनेक भागात फज्जा उडाला. काही भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चिखली मोशी रस्त्यावर दुकाने बंद होती. चिंचवडगावात काही ठिकाणी दुकाने सुरू तर काही बंद होती. खराळवाडी भागात दुकाने काहीशी बंद होती इतर ठिकाणीही अशीच अवस्था पहावयास मिळाली.
पिंपरी-चिंचवड शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणारे, थुंकणारे, मास्कविना फिरणारे आणि लॉकडाऊन नियमांचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आजपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नागरिकांनी सहकार्य केले नाही. तर त्यांच्याविरोधात गुन्हे देखील दाखल होऊ शकतील. दंडात्मक कारवाई तर होईलच पण गुन्हेही दाखल केली जातील.
– पिं. चिं. महापालिका आयुक्त…












