न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. जुलै. २०२०) :- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राजगुरुनगर शहरात सोमवार (दि. ६) पासून आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची घोषणा तहसीलदार तथा नगरपरिषदेच्या प्रशासकीय मुख्याधिकारी सुचित्रा आमले यांनी रविवारी ( दि .५ ) केली.
लॉकडाऊनमध्ये दूध, भाजीपाला, किराणा दुकाने सकाळी ७ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील. दवाखाने, मेडिकल, बँका, पतसंस्था व इतर अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.












