न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जुलै. २०२०) :- कोरोनाच्या विषाणुमुळे सर्वच उदयोगाबरोबरच इतरही उदयोग संकटात सापडले आहेत. पण यामध्ये हातावर पोट असलेल्यापैकी एक असलेल्या रिक्षा चालकावरही आचा उपासमारीबरोबरच आर्थिक संकटही आले आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेने आता ५ हजारापर्यंत विनाअट अनुदान द्यावे, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
रिक्षाचालकांनी नविन रिक्षा घेताना व दरवर्षाला पासिंगच्य नावाखाली शासनाच्या तिजोरित हजारो-लाखो रुपयाची भर टाकली आहे. आता कोरोनाच्या संकटकाळी त्यांचा व्यवसाय पुर्णपणे बंद आहे. त्यातच रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे देखील हप्ते सुरुच आहेत.
अशा परस्थितीत रिक्षा चालक व त्यांचे कुटूंब दुहेरी संकटात सापडले असून उपासमारीबरोबरच आर्थिक संकटदेखील त्यांच्यावर ओढावले आहे. अशा परस्थितीत महापालिकेने त्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान द्यावे.















