- सुखद घटना… कोरोनामुक्त रूग्णांची संख्या चार हजारांच्यावर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 12. जुलै. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. 12 जुलै) रोजी 318 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील 5 आणि हद्दीबाहेरील 3 अशा आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात पिंपरी ( पुरुष , वय -६० वर्ष ) , आकुर्डी ( पुरुष , वय -४३ वर्षे ) , आकुर्डी ( पुरुष , वय -६८ वर्षे ) , सांगवी ( पुरुष , वय ५७ वर्षे ) , चर्होली बु . ( स्त्री , वय -६१ वर्षे ) , मारुंजी ( पुरुष , वय -४८ वर्षे ) , बीड ( पुरुष , वय – ९५ वर्षे ) , देहूरोड ( स्त्री , वय -४६ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 7276 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 2465 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 107 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4312 वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.















