- कोरोनामुळे आज शहरातील १४ जणांचा तर हद्दीबाहेरील एकाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १५ जुलै) रोजी ४३२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील १४ आणि हद्दीबाहेरील १ अशा पंधरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात रहाटणी (पुरुष, ६९ वर्षे), भोसरी (पुरुष, ७० वर्षे), भोसरी (पुरुष, ७५ वर्षे), कासारवाडी ( स्त्री, ६८ वर्षे), अजंठानगर, निगडी (स्त्री, ६० वर्षे), दापोडी (पुरुष, ७२ वर्षे), पिंपरी (पुरुष, ६२ वर्षे), थेरगांव (पुरुष, ७२ वर्षे), अजंठानगर, चिंचवड (पुरुष, ५५ वर्षे), पिंपरीगांव (पुरुष, ७७ वर्षे), भोसरी (पुरुष, ७३ वर्षे), थेरगांव (पुरुष, ३६ वर्षे), भोसरी (स्त्री, ५५ वर्षे), दापोडी (पुरुष, ७६ वर्षे), औंधरोड ( स्त्री, ७३ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८६०३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १९५७ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५२३५ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


















