न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे माजी महासचिव कै. सुभाष हरीभारत सरीन यांचे काल दिनांक १६ जुलै २०२० रोजी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्ष होते. पिंपरी – चिंचवड शहरात गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ कामगारांसाठी लढणारी व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले.
कामगार कायद्याचा सखोल अभ्यास असल्यामुळे पुणे परिसरातील सर्वच कामगार चळवळीत त्यांचे योगदान होते. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ स्थापनेपासून ते महासचिव या पदावर कार्यरत होते. परंतु प्रकृती साथ देत नसल्याने मागील चार वर्षापासून त्यांनी कामकाज थांबविले होते, तथापि कामगार प्रश्नांविषयी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ते सदैव मदत करत असत. त्यांच्या निधनाने कामगार क्षेत्रातील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वास आपण मुकलो असून, आगामी काळात त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी व्यक्त केली.
कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, शिक्षक संघटनेचे कामगार नेते विजय कुंजीर, संतोष उपाध्ये, नानासाहेब तिटकारे , संजय येणारे , संपत पोटघन संतोष गवारे , शरद लावंड , नथुराम मादगुडे , शिवाजी दौंडकर , महासंघ पदाधिकारी सुप्रिया सुरगुडे , अविनाश ढमाले , योगेश रसाळ , बाळासाहेब कापसे , गोरख भालेकर , धनाजी नखाते , शुभांगी चव्हाण , अमित जाधव , सुरेश गारगोटे , योगेश वंजारे , अविनाश तिकोने , बाळासाहेब साठे , रणजित भोसले , नवनाथ शिंदे , सुभाष लांडे , रवी रोकडे , मिलिंद काटे , नरेंद्र शेंडगे , दीपक केदारी तसेच व इतर शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.















