- उद्या रविवारी मात्र, स. ८ ते सायं. ६ वाजेपर्यंत प्रशासनाची सूट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी (दि. १३ जुलै) मध्यरात्रीपासून १० दिवसांसाठी पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू आहे. आज शनिवारी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपला असून उद्या रविवारपासून लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. दुसरा टप्पा १९ ते २३ जुलैपर्यंत असेल.
याबाबत आज शनिवारी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी नियमावलीबाबतचा आदेश जाहीर केला आहे. सदर आदेशात नमुद केल्याप्रमाणे १९/०७/ २०२० ते २३/०७/२०२० याकाळात लॉकडाऊन शिथील करणेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…
१. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक १९/०७/२०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील.
२. सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / मंडई आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक १९/०७/२०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांचे विकी करणारे अधिकृत फेरीवाले यांचे मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहील.
३. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दिनांक १९/०७/२०२० ते २३/०७/२०२० या कालावधीत सकाळी ०८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहतील. परंतु लॉकडाऊन शिथील होताना दुकानांमध्ये / बाजारपेठेत होणाऱ्या संभाव्या गर्दीचा विचार करता कोविड १९ चे संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी फक्त दिनांक १९ / ०७/ २०२० रोजी उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधिल सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालु राहतील. तसेच दिनांक २०/०७/२०२० ते २३/०७/२०२० पर्यंत उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधिल सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहतील. तसेच संदर्भ क्र. ६ ते ८ मधिल उर्वरीत तपशिलामध्ये कोणताही बदल नाही.
उपरोक्त, आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द कोणतीही, व्यक्ती, संस्था, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ याची कलमे ५१ ते ६० च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यास पात्र असतील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.