- तर, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली साडेसहा हजारांच्या जवळपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १८ जुलै) रोजी ६५६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील १३ व हद्दीबाहेरील ०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात आकुर्डी (स्त्री ६५ वर्षे), पिंपरी (पुरुष ७२ वर्षे, स्त्री ६० वर्षे, पुरुष ५६ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७९ वर्षे, पुरुष ४९ वर्षे), चिंचवड (पुरुष ५५ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष, ३७ वर्षे व पुरुष, ७५ वर्षे), भोसरी (पुरुष ५३ वर्षे, पुरुष ४२ वर्षे, पुरुष ३८ वर्षे), निगडी (पुरुष, ६५ वर्षे), खेड (पुरुष, ७० वर्षे), खडकी (स्त्री, १२ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०४४६ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात २९९३ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६४८० वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.