न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- येत्या २३ जुलैपासून पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.