न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील २ हजार ११७ जणांची कोविड टेस्ट करण्यात आली असून, यापैकी १४९ जण करोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यातील १२० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी करोनावर मात केली असून, ते कर्तव्यावर देखील रुजू झाले आहेत.
यातील २९ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांनी दिली आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या १५ हजार ६३२ वर पोहचली असून, १० हजार १५८ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, अनेकांचा करोनामुळे मृत्यू देखील झाला आहे.