न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. जुलै. २०२०) :- लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील मंदिर बंद आहेत. त्यामुळे भाविक भक्त आपल्या श्रध्दास्थानच्या दर्शनापासून वंचित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडमधील आदमापूरचे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे सद्गुरू श्री. बाळूमामा यांच्या देवालयाची देखील यातून सुटका झालेली नाही.
मात्र, संस्थानने श्रावण महिण्यातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने बाळूमामांची मोठ्या भक्तिभावाने बेलाच्या पानांमध्ये मनमोहक सजावट करुन, पुजा केली. तसेच लाखो भक्तांना याचे दर्शन घडावे, यासाठी बाळूमामांच्या प्रसन्न मुद्रेतील फोटो सर्वत्र व्हायरल केले आहेत. त्यामुळे लाखो भक्तांना त्यांचे दर्शन घेता आले आहे.