न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. ऑगस्ट २०२०) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विदयमाने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्रशेठ तापकीर (मा. विरोधी पक्षनेते पिंचिंमनपा) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ॲड. सतिश घरत ( संचालक- शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ हे होते. अनिताताई तापकीर (मा. नगरसेविका पिं चिं मनपा), संस्थेचे सचिव सागर तापकीर, संचालक राजू पवार, मा. मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर व मुख्या. रेणू वर्मा हे उपस्थित होते.