न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे ३१ कोटी ९५ लाख रूपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
रावेत येथील पंपगृहांतर्गत जलउपसा क्षमता वाढविणेसाठी आवश्यक पंपिंग मशीनची उभारणी करणे व त्या अनुषंगिक कामांसाठी येणा-या १२ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या Covid-19 या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या माहे मे व जून २०२० या कालावधीत हाउसकिपिंग कामाकरिता झालेल्या ४९ लाख ८६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. क्रीडा विभागास आवश्यक स्काय वॉकर ओपन जिम साहित्य खरेदीकमी येणा-या ९५ लाख ६३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.














