न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २३ ऑगस्ट) रोजी ७५० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात काळेवाडी ( स्त्री ५० वर्षे, स्त्री ६३ वर्षे) चिंचवड ( स्त्री ७३ वर्षे), थेरगाव (पुरुष ४६ वर्षे), निगडी ( स्त्री ४५ वर्ष), सांगवी (पुरुष ८२ वर्ष), जुन्नर (पुरुष ५० वर्षे), आंबेगाव (पुरुष ३९ वर्षे, स्त्री ६५ वर्षे), खेड (पुरुष ७२ वर्षे), धानोरी (पुरुष ५० वर्षे) या रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ४१६४८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७९५७ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















