न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- गणेशोत्सव व मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ गुंडांना ३१ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजल्यापासून २ सप्टेंबर रोजी सकाळी वाजेपर्यंत अकरा चिखली, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सव आणि मोहरम दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विविध कारवाया, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. कोंबिंग ऑपरेशन, पथसंचालन करून नागरिकांमध्ये मोहर्रमच्या विश्वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे. चिखली परिसरात वास्तव्यास असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील २१ गुंडांवर पोलिसांनी सप्टेंबर रोजी सीआरपीसी कलम १४४ नुसार हद्दपारीची कारवाई केली आहे.
तळेगाव, चिखलीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी देहूरोड विभागाचे आयुक्त संजय नाईक – पाटील यांच्याकडे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावाला सहाय्यक आयुक्त नाईक आणि पाटील यांनी मंजुरी दिली असून विविध २१ गुन्हेगारांना ३१ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजल्यापासून २ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे. देहुरोड विभागात चिखली, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. कारवाई केलेल्या गुन्हेगारांना वरील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास तसेच वास्तव्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यामुळे सराईत गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक सतिश माने, उपनिरीक्षक विठ्ठल बडे, हवालदार दत्तात्रय कदम, बाजीराव चौधर यांनी केली आहे.















