न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- कासारवाडी येथे पिंपळे गुरव ब्रिजजवळ पवना नदीपात्रात निळ्या पुररेषेमध्ये १८ फेब्रुवारी २०२० रोजी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकून आरोपींनी भराव केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर विभागाकडून संबंधितांना टाकलेला भराव काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र, आरोपींनी नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून जालिंदर किसन लांडे, विजया दत्तात्रय लांडे, बाळू किसन लांडे आणि सातबारा उता-यावर नावे असेलेल्या अन्य ५१ जणांच्या विरोधात महराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ क २६०, २६१, २६७ आणि ४७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















