पाऊणे सातशेच्यावर रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ०७ सप्टेंबर) रोजी १२५९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६७६ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात भोसरी ( स्त्री ६० वर्षे), संभाजीनगर (पुरुष ७३ वर्षे), निगडी (स्त्री ८५ वर्षे, पुरुष ६८ वर्ष), दिघी (पुरुष ८३ वर्ष), पिंपळे निलख (पुरुष ५० वर्षे), आकुर्डी (पुरुष ६१ वर्षे), थेरगांव (स्त्री ६६ वर्ष, पुरुष ६५ वर्ष, पुरुष ५४ वर्ष), संत तूकाराम नगर, पिंपरी (पुरुष ६१ वर्षे), शाहूनगर (पुरुष ७९ वर्षे), मासुळकर कॉलनी (पुरुप ८६ वर्षे), खराळवाडी (स्त्री ७४ वर्ष), सांगवी (पुरुष ३० वर्षे), इंद्रायणीनगर (पुरुष ७२ वर्षे), चिंचवड ( स्त्री ७२ वर्ष), चिंबळी ( पुरुष ८५ वर्ष), देहूगांव (पुरुष ६५ वर्षे), मावळ (पुरुष ६० वर्षे), देहूरोड (स्त्री ६५ वर्षे), शिरूर (स्त्री ७६ वर्षे), पुणे (पुरुष ६५ वर्षे), खेड (पुरुष ५७ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५६४९३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४७०७७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ९४३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.