न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- महिलेकडे बघून अश्लील हातवारे करणाऱ्या आणि विवाहितेचा हात पकडून लग्नाची विचारणा केल्याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आरोपींवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मिलिंद मारुती मोहिते (वय ४०) आणि अमर हंचाटे (वय ४०, दोघे रा. सिद्धिविनायक थरमॅक्स सोसायटी, प्राधिकरण निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या घटनेत कामावरून घरी येत असलेल्या विवाहितेस रस्त्यात अडवून हात पकडून लग्नाची मागणी घातली. याप्रकरणी गणेश मनोहर जगताप (वय ३३, रा. आम्रपाली केटरिंग, सांगवी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.