न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहून महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी तहकूब केली. तहकूब सभा दिनांक ६ ऑक्टोबरला होणार आहे.
महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रावर सहा विषय होते. या वेळी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत वाणी, साहेबराव खरात यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ही सभा ६ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली.