न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शहरातील ८ क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षांची निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे. त्या संदर्भातील नियोजनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी बैठक मंगळवारी (दि. २२) आयोजित केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांना जमावबंदीसह निवडणूक घेण्यास बंदी घातली होती. त्यामुळे क्षेत्रीय समितीसह विविध विषय समिती सभापतींची निवडणूक पालिका प्रशासनाने घेतली नव्हती. मात्र, राज्य शासनाने ९ सप्टेंबरच्या आदेशानुसार ऑनलाइन माध्यमातून निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या नगरसचिव विभागाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
पालिकेच्या एकूण ३२ प्रभागानुसार ८ क्षेत्रीय समिती कार्यालय आहेत. त्या समितीवर ४ प्रभागातील १६ वा नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडला जातो. प्रभाग अध्यक्षांचा वर्षभराचा कार्यकाळ एप्रिल २०२० ला संपला आहे. राज्य शासनाने निवडणूका न घेता त्यांना मुदतवाढ देण्यास सांगितल्याने ते पदावर कायम आहेत.















