न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२०) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नव्या कोऱ्या महागड्या बुलेट चोरून त्या फेसबुकच्या माध्यमातून उस्मानाबाद, धुळे, बीड आणि अहमदनगर येथे १० ते १५ हजार रुपयांत विकणाऱ्या चोरट्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
त्याच्याकडून १७ लाखांच्या १४ दुचाक्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, या चोरट्याला अटक करणाऱ्या पोलिस पथकाला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या बुलेट राजाला घेऊन अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर काही दिवसांनी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्याच्यासह पोलिस पथकाची तपासणी करण्यात आली. तेव्हा दोन अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.